पैसे थकवल्याने इंटिरियर डिझायनरची आत्महत्या, अर्णब गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल

मुळचे कावीर येथे राहणारे अन्‍वय नाईक  हे मुंबईत व्‍यवसायानिमित्‍त राहतात.


मुंबईतील इंटिरियर डिझायनर (अंतर्गत वास्तुरचनाकार) अन्वय मधुकर नाईक (वय 52) यांनी शनिवारी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अर्णब  व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


मुळचे कावीर येथे राहणारे अन्‍वय नाईक  हे मुंबईत व्‍यवसायानिमित्‍त राहतात. त्यांचा मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी ते कावीर येथील आपल्या घरी आले होते. शनिवारी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्याठिकाणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली जी चिठ्ठी मिळाली, त्यात अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट  स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. दरम्यान, नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.


पोलीस अधीक्षक अनिल परस्कार यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला, नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या तिघांची नावे लिहिली होती. तसेच नाईक यांच्या पत्नीनेही दिलेल्या तक्रारीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


6 मई 2018 के सुसाइड केस में टीवी एंकर अर्णब गोस्वामी के खिलाफ केस दर्ज... कांग्रेस का सवाल बिना बेल के कैसे अर्नब खुला घूम रहा है... मुश्किलें बढ़ने के चांस... 


https://www.google.com/amp/s/www.nationalheraldindia.com/amp/story/india%252Fsuicide-abetment-case-why-is-arnab-goswami-free-without-anticipatory-bail


BJP अर्नब को बचाने के लिए खेल अभी भी खेल रही है कि 27 मई तक उद्धव चुनाव ना करवा सके और CM पद छोड़ दे... लेकीन BJP यह भूल रही है कि, जो पैंतरे वो खेलती है, दूसरे भी अब समझते और खेलना जानते हैं...


Source-loksatta